UPSC full form in Marathi

UPSC Information In Marathi | UPSC म्हणजे काय?

यूपीएससी ही एक स्वतंत्र संस्था आहे. ही संस्था केंद्रात आणि राज्यात लेव्हल अ आणि लेव्हल बी चे कर्मचारी भरती करण्याचे काम करते.UPSC म्हणजेच संघ लोक सेवा आयोग याची स्थापना १ ऑक्टोबर १९२६ रोजी झाली.यूपीएससीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. यूपीएससी दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर सिविल सर्विस परीक्षा घेते.या लेखात आपण UPSC द्वारे भरली जात असलेली पदे तसेच त्यांची माहिती जाऊन घेणार आहोत.

UPSC पदांची माहिती | UPSC Full Form In Marathi

UPSC म्हणजेच संघ लोक सेवा आयोग हे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेते.दरवर्षी लाखों मुले ही परीक्षा देतात.आयोग यातील योग्य ते उमेदवार निवडतात.निवडण्यात आलेले उमेदवार खालील सेवेत भारती केले जातात.

  • भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस/IAS)
  • भारतीय पोलिस सेवा (आयपीएस/IPS)
  • भारतीय महसूल सेवा (आयआरएस/IRS)
  • भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस/IFS)

यूपीएससी विविध क्षेत्रात लेव्हल अ आणि लेव्हल बी चे अधिकारी भरतीसाठी परीक्षा घेते.ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते.केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या २४ सेवांमध्ये भारती करण्यासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते.

यूपीएससीचे कार्ये काय आहेत | UPSC Work In Marathi

भारतीय घटना कलम ३२० च्या अंतर्गत नागरी सेवा आणि पदांवर भरती संबंधित सर्व जबाबदारी ही यूपीएससी कडे आहे.यूपीएससी चे कार्य खालील प्रकारे

  1. यूपीएससी अंतर्गत येणाऱ्या सेवांमध्ये नियुक्तीसाठी परीक्षा घेणे.
  2. मुलाखतीद्वारे थेट भरती प्रक्रिया राभवणे.
  3. पदोन्नती / प्रतिनियुक्ती करून अधिकाऱ्यांची नेमणूक करणे.
  4. शासनाच्या अधीन असलेल्या विविध सेवा व पदांसाठी भरती नियमांची तयारी व दुरुस्ती करणे.
  5. विविध नागरी सेवांशी संबंधित शिस्तविषयक बाबी सांभाळणे.
  6. आयोग संदर्भात राष्ट्रपति द्वारे सरकारला सल्ला देणे.

IAS Full Form In Marathi | यूपीएससी पदांचे फूल फॉर्म

पदाचे नावफूल फॉर्म
IASIndian Administrative Service
भारतीय प्रशासकीय सेवा
IPSIndian Police Service
भारतीय पोलिस सेवा
IFSIndian Foreign Service
भारतीय परराष्ट्र सेवा
IRSIndian Revenue Service
भारतीय महसूल सेवा

UPSC चा इतिहास मराठी मध्ये

भारतात पात्रता वर आधारित सिविल सेवा 1854 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने केली. सुरुवातील UPSC च्या परीक्षा फक्त लंडन मध्ये होत होत्या आणि तेव्हा अभ्यासक्रम असा सेट केला जायचा की त्यात फक्त ब्रिटिशच उत्तीर्ण होतील असं. एवढे असूनही 1864 मध्ये पहिले भारतीय सत्येंद्रनाथ टैगोर UPSC मध्ये उत्तीर्ण झाले.

त्यानंतर प्रथम युध्यानंतर UPSC चे आयोजन भारतात केले गेले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *