उदाहरणे. मी , तू , तो , हा , जो , कोण , काय , आपण , स्वतः इत्यादी
i) तो दररोज शाळेत जातो
ii) आपण एकत्र बसून जेवण करू
सर्वनामचे एकूण सहा प्रकार पडतात :१) पुरुषवाचक २) दर्शक ३) संबंधी ४) प्रश्नार्थक ५) सामान्य ६) आत्मवाचक
१) . पुरुषवाचक सर्वनाम
पुरुषवाचक सर्वनामचे तीन उपप्रकार पडतात:-
अ) प्रथम पुरुषवाचक
ब) द्वितीय पुरुषवाचक
क) तृतीय पुरुषवाचक
अ) प्रथम पुरुषवाचक
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीनी स्वतःबद्दल वापरलेले सर्वनाम होय.
उदाहरणे. मी , आम्ही , आपण , स्वतः इत्यादी
i)आज मी शाळेत जाणार
ii) आपण मंदिरात दर्शनाला जाऊ
ब) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे एखादी बोलणारी व्यक्ती ज्यांच्याशी बोलते , त्यांच्याशी वापरलेले सर्वनाम होय.
उदाहरणे. तू , तुम्ही , आपण , स्वतः इत्यादी
i) तू नेहमी शाळेत उशिरा येतोस
ii) तुम्ही उद्या सकाळी झेंडावंदनला हजर रहा.
क) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे एखादी बोलणारी व्यक्ती ज्यांच्याविषयी बोलते त्यांच्याविषयी वापरलेले सर्वनाम होय.
उदाहरणे. तो , ती , ते , त्या इत्यादी
i) तो दररोज सकाळी लवकर उठतो
ii) त्या बाई नेहमी मुलाशी भांडत असतात
२) दर्शक सर्वनाम
जवळच्या किंवा दूरच्या व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांस दर्शक सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरणे. हा , ही ,हे ,तो , ती , ते ,तेथे , हेथे इत्यादी
i) तेथे जाऊ नकोस
ii) ते सर्वजण क्रिकेट खेळत होते
iii) हा फळा
iv) ती आगगाडी
३). संबंध दर्शक सर्वनाम
नामाएवजी येणाऱ्या आणि दोन वाक्य जोडण्याचे काम करणाऱ्या सर्वनामास संबंध दर्शक सर्व नाम असे म्हणतात.
उदाहरणे. जो , जी , ज्या, जे इत्यादी
i) जो प्रयत्न करतो त्याला यश मिलते
४). प्रश्नार्थक सर्वनाम
प्रश्न विचारण्यासाठी वापर होणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरणे. कोणाला , काय , कोण , कोणाला , कोणी इत्यादी.
i) तुम्हाला काय पाहिजे?
ii)तुम्ही कोण आहात?
५) . सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चत सर्वनाम
वाक्यात येणारे सर्वनाम हे कोणत्या नामासाठी आले हे जर निश्चतपणे सांगता येत नसेल तर त्यास सामान्य/ अनिश्चत सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरणे. कोण , काय इत्यादी
i)कोणी कोणाचे मन दुखवू नये .
ii) शिक्षक काय सांगतात त्याकडे नीट लक्ष ठेवा