नमस्कार मित्रांनो, कधी ना कधी IAS हा शब्द तुमच्या कानावर आलाच असेल. परंतु तुम्हाला त्याबद्दल पूर्ण माहिती नसेल.
तुम्हाला माहित आहे का कि IAS म्हणजे काय?, IAS चा इतिहास, IAS साठी लागणारी पात्रता, IAS अधिकाऱ्यांचे काम आणि जिम्मेदारी, IAS Meaning In Marathi, IAS Full Form In Marathi काय होतो. तर मित्रांनो तुमच्या या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण या लेखात बघणार आहोत. तुम्हाला फक्त हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल जेणेकरून तुमची सर्व प्रश्न/शंका दूर होतील. तसेच IAS बद्दल अजून काही शंका असल्यास आम्हाला खाली Comment करून विचारा.
IAS म्हणजे काय? IAS kay aahe?
IAS म्हणजे “भारतीय प्रशासकीय सेवा” होय. आय ए एस ला समजामध्ये आणि सरकारी विभागामध्ये खूप मान असतो. म्हणूनच IAS हि एक खूप जास्त जिम्मेदारी असणारे सरकारी पद आहे. दरवर्षी बरेच लोक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात आणि त्यामधील बहुतेक लोकांना IAS होण्याची इच्छा असते.
परंतु, IAS होणे इतके सोप्पे नाही. IAS होण्याकरिता दिवस-रात्र एक करून अभ्यास करावा लागतो. आपण खाली जाणून घेणारच आहोत कि आय ए एस होण्यासाठी काय पात्रता लागते? IAS होण्याकरिता परीक्षा द्यावी लागते, ती परीक्षा “संघ लोकसेवा आयोग” (UPSC- Union Public Service Commission) या विभागाकडून घेतली जाते. हि परीक्षा अशा प्रकारे आयोजित केली जाते कि योग्य आणि जिम्मेदार अधिकारी निवडल्या जातो. IAS या पदासाठी जिम्मेदार अधिकारी निवडणे फार गरजेचे असते. कारण, हेच एकुलते एक पद असे आहे कि या पदाकडे सर्व सरकारी पदाचे नियंत्रण असते. कधी कधी आय ए एस (IAS) हे जिल्हाधिकारी (District Magistrate) म्हणून कार्यरत असतात.
IAS चा इतिहास-History of IAS
IAS चा हा खूप जुना आणि स्वातंत्र्यच्या काळातील आहे. वर्ष १९४७ मध्ये भारताचे विभाजन झाले. त्यामुळे भारतात असलेल्या सिव्हिल सर्विस ला भारत आणि पाकिस्तान यामध्ये विभाजित केले गेले.
जो भाग भारतात राहिला त्याला ‘भारतीय प्रशासकीय सेवा’ असे नाव दिले गेले आणि जो भाग पाकिस्तान ला देण्यात आला त्याला ‘केंद्रीय सुपीरियर सेवा’ असे नाव देण्यात आले.